आज दिनांक 6 सप्टेंबर 2025 वेळ सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे गणेश भक्तांची तुफान गर्दी पाहायला मिळत असून आज गणेश विसर्जन मोठ्या उत्साहामध्ये करण्यात येत असून मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागच्या राजाचे गणेश विसर्जनही याच ठिकाणी केले जाते तसेच अनेक मोठ्या गणेश मंडळाचे गणपती विसर्जन ही गिरगाव चौपाटीवर करण्यात येते याकरिता मुंबई महानगरपालिका तसेच मुंबई पोलिसांनी व्यवस्था व अनेक उपाययोजना केली आहे.