राजकारणात 'ध' चा 'मा' कसा होतो, हे अलीकडच्या घटनेवरून समजले. मी स्वतःहून भंडाऱ्याचे पालकमंत्री पद सोडले मात्र बातम्या वेगळ्याच आल्या, असे प्रतिपादन राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी केले. ते महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या अवतरण दिनानिमित्त गुरूवारी २८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता जळगावात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी त्यांनी महाराज आणि आपल्या संबंधाबाबतही भाष्य केले.