परंडा पोलीस ठाणे पथकाची दि.30 ऑगस्ट रोजी परंडा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक विनोद ईज्जपवार व सपोनि कविता मुसळे यांना गुप्त बातबीदारामार्फत माहिती मिळाली की,परंडा शहरातील शहाजी माळी याने त्याचे व्हाटसअप प्रोफाईल वरती पिस्टल हातात धरुन फोटो ठेवलेला आहे.सदरील फोटो पाहून सदरील तरुण हा शहाजी माळी आहे.अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने यावर परंडा पोलीस ठाण्याचे पथकाने सदर ठिकाणी जावून नमुद इसमास ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला लावलेली गावठी पिस्टल मिळून आली.