मोताळा तालुक्यातील बोराखेडी फाटा येथून 25 वर्षीय विवाहित युवती 20 ऑगस्ट रोजी हरविल्याची नोंद 21 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता बोराखेडी पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.बोराखेडी फाटा येथून सौ.मिना उर्फ सोनाबाई दादाराव शिंदे ही 25 वर्षीय विवाहित युवती कोणाला काही न सांगता बेपत्ता झाली असून तीचा मैत्रीणी व नातेवाईकाकडे शोध घेतला असता कुठेही आढळून आली नाही नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून हरविल्याची नोंद बोराखेडी पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.