जुन्या भांडणाचे कारणावरुन ट्रॅक्टर अडवून चालकास मारहाण केल्याची घटना मेरा खुर्द येथे २७ ऑगस्ट रोजी घडली.अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मेरा खुर्द येथील रहिवाशी दीपक ज्ञानेश्वर वाघमारे वय ३६ वर्ष यांनी तक्रारीमध्ये नमूद आहे की, माझा भाऊ विलास ज्ञानेश्वर वाघमारे हा सरपंच रमेश अवचार यांच्याकडे शेती कामाला असून २७ ऑगस्ट रोजी औषध फवारणी करण्यासाठी शेतात ट्रॅक्टर घेऊन जात असतांना गावातीलच ३ जणांनी त्याचेसमोर येऊन ट्रॅक्टर अडविले.