सोलापूरमध्ये बेकायदेशीर माती उत्खननाविरुद्ध कारवाई थांबवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका महिला आयपीएस अधिकाऱ्यावर दबाव आणल्याचा दावा करणाऱ्या व्हायरल व्हिडिओवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास प्रतिक्रिया दिली. हा मुद्दा बेकायदेशीर खाणकामाशी संबंधित असून, अंजली कृष्णा या तरुण आयपीएस अधिकाऱ्याने सरकारी तिजोरीचे नुकसान करणाऱ्या बेकायदेशीर खाणकामास आळा घातला होता. स्थानिक लोकांच्या तक्रारींनंतर त्यांनी हे काम थांबवण्यात यश मिळवले.