बोरिवलीतील नायडू क्लबच्या वतीने मागील २५ वर्षांपासून आयोजित होणाऱ्या नवरात्री उत्सव २०२५ (कोरकेंद्र ग्राउंड १) च्या भूमिपूजन आज सोमवार दिनांक १ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३ च्या सुमारास करण्यात आले. बोरिवलीतील ही सर्वात जुनी नवरात्री असून, याचे आयोजन गणेश नायडूजी यांच्या प्रयत्नातून करण्यात येते. या प्रसंगी आमदार संजय उपाध्याय, माजी खासदार गोपाळ शेट्टी, भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.