संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन च्या वतीने बाबा गुरुबच्चन सिंग महाराज यांच्या मानव एकता कार्याच्या स्मरणार्थ संपूर्ण देशामध्ये एकाच दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते या अनुषंगाने दिनांक 24ऑगस्ट रोजी वाशिम शहरातील लाखाळा परिसरातील निरंकारी भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विधान परिषदेचे शिक्षक आमदार किरण राव सरनाईक उपस्थित होते.