पालघर तालुक्यातील बोईसर नजीक पास्थळ परिसरात एका तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बालाजी कॉम्प्लेक्स येथील एका सदनिकेत तरुणाचा मृतदेह आढळून आला. हरीश सुखाडिया असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अनैतिक प्रेम संबंधातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली असून आरोपी फरार आहेत. याप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.