शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ प्रारंभ झाल्यापासून माहे जून २०२५ व माहे जुलै २०२५ चे शालेय पोषण आहाराचे धान्य शाळेत तात्काळ पुरवठा करा, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदूरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, हाना पटले आदी उपस्थित होते