माझ्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर तब्बल एक महिन्यानंतर मी सक्रिय झालो आहे. आता मतदारसंघातील लोकांची कामे करणार आहे. दरम्यान, घोडा आणि मैदान लांब नाही, विरोधकांनी टीका करावी, त्यांना मी कामातून उत्तर देईन, अशी प्रतिक्रिया आमदार राजू खरे यांनी दिली आहे. ते आज सोमवार दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मोहोळ येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.