लोहारा परिसरातील रेणुका नगरातील काही घरे यंदाच्या नव्या प्रभाग रचनेतून पुन्हा वगळण्यात आल्याने संतप्त रहिवाशांनी आज जिल्हाधिकारी,यवतमाळ यांना निवेदन देऊन या घरांचा नगरपरिषदेच्या हद्दीत तातडीने समावेश करण्याची ठाम मागणी केली.रेणुका नगर कमलेश्वर महादेव मंदिराच्या मागील भागातील रहिवाशांचा हा प्रश्न २०१६-१७ पासून सुरू आहे.त्या काळी प्रभाग रचनेत काही घरे वगळण्यात आली होती...