भुसावळ तालुक्यातील वराडसीम गावात महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ व झुंजार लेवा ग्रुप वराडसीम यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या आरोग्य तपासणी शिबिरात 369 लोकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला तसेच गरजू रुग्णांना मोफत औषधी वाटप करण्यात आल्याची माहिती दिनांक ५ रोजी लेवा पाटीदार महासंघाचे पराग भारंबे यांनी दिली.