सांगोला तालुक्यात गेल्या 18 तासांपासून मुसळधार पाऊस पडत असून, याचा मोठा फटका ग्रामीण भागाला बसला आहे. तालुक्यातील डिकसळ गावात या पावसामुळे पाच मातीची घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सततच्या पावसामुळे ही मातीची कच्ची घरे भिजून कोसळली आहेत, ज्यामुळे कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. पीडित कुटुंबांनी त्वरित शासकीय मदत मिळण्याची मागणी केली आहे.