वडाळा येथील जीएसबी सार्वजनिक गणेशोत्सव समिती येथे विराजमान गणरायाचे भक्तिपूर्ण वातावरणात आज शनिवार दिनांक ३० ऑगस्ट २०२५ रोजी रात्री आठच्या सुमारास महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सपत्नीक दर्शन घेतले. या उत्सवाच्या माध्यमातून समाजात धार्मिक आणि सांस्कृतिक जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. संस्कृतीचे जतन करत समाजात एकता आणि ऐक्य निर्माण होवो, अशी श्रीगणेशाच्या चरणी प्रार्थना केली. असे देखील मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले आहे.