जिल्ह्यात गेले अनेक दिवस सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील कुत्तरडोह ते अमानवाडी दरम्यान असलेल्या काटेपूर्णा नदीवरील पुलाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे दिनांक 29 ऑगस्ट रोजी संध्याकाळी चार वाजता या पुलावरून जाणाऱ्यांना अनेक अडचणी येऊ लागल्या कोणतेही मोठे वाहन या पुलावरून जात नाही तर दुचाकी चालकालाही तारेवरची कसरत करावी लागत आहे.