चंद्रपूर जिल्ह्यात अवैध गोवंश वाहतुकीच्या घटनेत पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनातून (क्रमांक MH 34 BZ 8428) तीन बैलांची कत्तलीसाठी अवैध वाहतूक करणाऱ्या तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, वाहन आणि बैल जप्त करण्यात आले आहेत. जिवती पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ११५/२०२५ अंतर्गत प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११ (१) (ड) आणि महाराष्ट्र पशू संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५ (अ) (ब) आणि ९ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.