माओवादाच्या प्रभावाला झुगारत मुख्य प्रवाहामध्ये सामिल होताना दिसून येत आहेत. तसेच सन 2022 मध्ये एकूण 73, सन 2023 मध्ये 46 व मागील वर्षी 2024 मध्ये एकूण 26 भरमार बंदूका जिल्ह्रातील नागरिकांनी गडचिरोली पोलीस दलासमक्ष स्वाधीन केलेल्या होत्या. मागील तीन वर्षात इतक्या मोठ¬ा प्रमाणात भरमार बंदूका जिल्ह्रातील नागरिकांनी पोलीस दलाच्या स्वाधीन केल्या आहेत, हे पाहता येथील नागरिकांच्या मनात गडचिरोली पोलीस दलाप्रति विश्वास दृढ होताना दिसून येत आहे.