नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील बारीपाडा ते वेहगी दरम्यान देव नदीवर पूल नसल्यामुळे आदिवासी बांधवांना मध्यरात्री सर्पदंश महिलेला बांबूच्या झोळीतून मोलगी ग्रामीण रुग्णालयापर्यंत घेऊन जाण्याची वेळ आली. हा जीवघेणा प्रवास महिलेच्या जीवावर बेतू शकत होता. ग्रामस्थांनी शासनाच्या या दुर्लक्षित कारभारामुळे नाराजी व्यक्त केली.