"आर्थिक व्यवहार वैयक्तिक – आमदार खताळ यांचा काहीही संबंध नाही!" प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ यांच्याशी झालेले सर्व आर्थिक व्यवहार हे पूर्णतः वैयक्तिक असून त्यामध्ये आमदार अमोल खताळ यांचा कोणताही संबंध नाही, असा ठाम इशारा रवींद्र ज्ञानदेव देशमुख यांनी दिला आहे. आज दुपारी ३ वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत देशमुख यांनी पत्रकाद्वारे माहिती देताना स्पष्ट केले की, प्रसाद गुंजाळ हे शहरात ट्रेडिंग व्यवसाय करत असून त्यांच्याशी गेली वीस वर्षांपासून वैयक्तिक मैत्रीचे संबंध आहेत.