कुंभार पिंपळगाव व परिसरातील रुग्णांवर संजीवनी हॉस्पिटल,जालना येथे उपचार चालू आहेत.आज हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस माजी मंत्री राजेश टोपे यांनी करून डॉक्टरांना योग्य उपचार करणेबाबत सूचना दिल्या.डेंग्यू व इतर आजार टाळण्यासाठी प्रशासनाने डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यासाठी फवारणी करावी,डास प्रतिबंधक उपाययोजनांविषयी जनजागृती करून नागरिकांनी डेंग्यू किंवा इतर आजाराची आजाराची लक्षणे दिसल्यास लगेचच जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.