कारंजा अमरावती मार्गावर विलेगाव फाटा जवळ दि. 25 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजताच्या दरम्यान अपघात होवून 1 जण ठार तर एक जखमी झाल्याची घटना घडली. सदर घटनेची माहिती सागर वाघ यांनी दादाजी रुग्णवाहिका यांना दिल्यानंतर रुग्णसेवक संदेश मेश्राम व छोटू उके यांनी घटनास्थळी पोहचून अपघातग्रस्तांना त्वरित ग्रामीण रुग्णालय कामरगाव येथे भरती केले. अपघातामधील मृतक हा कारंजा येथील रहिवासी असल्याचे समजते.