लांजा तालुक्यात थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माचाळ येथील रिव्हर्स फॉल परिसरात मंगळवार २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. दाट धुक्याचा अंदाज न आल्याने एका इर्टिगा कार सुमारे १०० फूट खोल दरी कोसळली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र एका महिलेला किरकोळ दुखापत झाली आहे.