मोहाडी निवासी योगेश (बाबा) हरीकिशन बघेले यांची पुन्हा काँगेस मध्ये घरवापशी झाली. आज दिनांक 1 सप्टेंबर रोजी गुरुकृपा लाॅन येथे दुपारी 3 वाजेच्या सुमारास खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्ष पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत योगेश बघेले यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केली. 11 ऑगस्ट 2025 रोजी योगेश बघेले यांनी गोंदियात झालेल्या एका कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला होता.