जालना शहरातील मोती तलावात तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या स्मारकाचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी तीव्र होत असून, यासाठी जालना जिल्ह्यातील आंबेडकरी समाजाने शनिवार दि. 13 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली. त्यावेळी समाजाने स्मारक उभारणीसाठी ठाम पवित्रा घेतला आहे. यावेळी जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते, भीमसैनिक तसेच समाजबांधवांची उपस्थिती होती. या बैठकीत स्मारकाच्या कामातील झालेल्या विलंबाबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.