गेल्या काही दिवसांपासून भाजप व त्यांच्या मित्र पक्षांकडून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची हत्या करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.त्यामुळे राहुल गांधी यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली आहे पण सरकार आणि भाजपने अद्यापही कोणतीही कारवाई केली नाही.त्यामुळे या विरोधात आज दि.19 सप्टेंबर रोजी दु.1 वा. जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शने आंदोलन करण्यात आले