पंढरपूर येथील शिवतीर्थ येथे दहीहंडी कार्यक्रमानिमित्त नृत्यांगना नाचवण्यात आल्या यावर प्रतिक्रिया देताना आमदार समाधान आवताडे यांनी शिवतीर्थावर नद्यांकना नाचविण्यात येणार असेल तर सहन करणार नाही. दरम्यान, अशा कार्यक्रमांना पोलिसांनी कार्यक्रम कशा पद्धतीने होणार आहे हे बघूनच परवानगी द्यावी अशी प्रतिक्रिया आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे. याबाबत आमदार समाधान आवताडे यांनी आज शनिवार दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12 वाजता सोशल मीडियाद्वारे व्हिडिओ शेअर करत प्रतिक्रिया दिली.