संपूर्ण तालुक्यात गणेशोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला. तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी आपले जनसंपर्क कार्यालय तिरोडा येथे भगवान श्री गणेशाची स्थापना केली होती. गणेशोत्सवा दरम्यान भगवान गणपतीची विधिवत भजन किर्तनासह पूजा करण्यात आली व या उत्सवा निमित्त दही काल्याचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी आमदार विजय रहांगडाले सह तिरोडा शहरातील व परिसरातील विविध मान्यवर उपस्थित होते.