मोहगांव जंगलातील चंदन तोडून त्याची तस्करी करणाऱ्याचा डाव वनविभाग,पोलीस व गावकऱ्यांनी उधळून लाव रात्रभर पाटलाग करून सहा जणांना नागपूर जिल्ह्यातील बोथली शेत शिवारात पकडले तर एक जण फरार झाला.यावेळी आरोपींच्या ताब्यातून १लाख रुपये किमतीचे ४३ किलो ८०३ ग्रॅम चंदन एक कार तिन मोबाईल, दोन आरे एक कु-हाड असा एकूण ३ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केली.हि कारवाई उपवनसंरक्षक हरबिंदर सिंग यांच्या मार्गदर्शनात वनपरीश्रेत्र अधिकारी निलेश गावंडे यांच्या प्रत्यक्ष नेतृत्व केली आहे.