वाशिम येथील शहर पोलीस स्टेशन मध्ये स्थापन करण्यात आलेल्या गणपती बाप्पाचे विसर्जन मोठ्या उत्साहात दिनांक 9 सप्टेंबर रोजी रात्री करण्यात आले. यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पारंपारिक वेशभूषेत ढोल ताशाच्या गजरात जल्लोष करत गणरायाला भक्तिपूर्ण निरोप दिला. सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी पोलिसांवर बंदोबस्ताचा मोठा ताण असतो त्यामुळे गणेश विसर्जनाच्या तीन दिवसानंतर पोलिसांनी त्यांच्या गणरायाला निरोप दिला. गणपती विसर्जन मिरवणूक ही एक प्रकारे पोलिसांसाठी एक अनौपचारिक आनंदोत्सव ठरला.