सायंकाळच्या सुमारास देशी दारूची भट्टी कुलूपबंद करून त्यातील सर्व कर्मचारी घरी गेली असता मध्यरात्रीच्या सुमारास कोणी नसल्याचा गैरफायदा उचलत चोरट्याने देशी दारूच्या भट्टीचे कुलूप तोडून आत मध्ये प्रवेश करून काउंटर मधून नगदी रोख व पेटीमधील देशी दारू चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. ही घटना ५ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास बेटाळा येथे उघडकीस आली. या घटनेत अर्जुन श्रीराम नान्हे (४२) रा घोडेघाट वार्ड पवनी यांच्या तक्रारीवरून गणेश राजू वैद्य (२४) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.