जीएसटी सुधारणांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गुरुवारी दुपारी २.३० च्या सुमारास प्रतिक्रिया दिली. दुसऱ्या पिढीतील जीएसटी सुधारणांसाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो आणि जीएसटी परिषदेचेही अभिनंदन करतो. जेव्हा जीएसटी पहिल्यांदा लागू करण्यात आला तेव्हा लोकांना नुकसान होण्याची भीती होती आणि त्यांना एकाच कर प्रणालीवर शंका होती, तरीही देशात अभूतपूर्व कर संकलन झाले, ज्यामध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानावर होता.