सोलापूर महापालिकेच्या निष्क्रियतेमुळे सोलापूर शहरातील नागरिकांना अतिवृष्टीच्या वेळी मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप आमदार विजयकुमार देशमुख यांनी गुरुवारी दुपारी 2 वाजता पत्रकारांशी बोलताना केला आहे. शेळगीसह शहरातील विविध भागात ढगफुटी सदृश्य जोरदार पाऊस झाल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आमदार विजयकुमार देशमुख यांनी महापालिकेच्या कारभारावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.