आज दिनांक सात स्पटेंबर रोजी दुपारी दोन वाजता माहिती मिळाली की कन्नड तालुक्यातील सैनिकांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाचनवेल येथील भारतीय पूर्वसैनिक कैलाशवासी भिकन माणिकराव शिंदे यांचे सकाळी दुःखद निधन झाले. बिकट परिस्थितीतून सैन्यात भरती होऊन त्यांनी तब्बल १८ वर्षे देशसेवा केली होती. भारत-पाकिस्तान युद्धातही त्यांचा सहभाग होता. त्यांच्या निधनानंतर गावात आणि जिल्हाभरातून आजी-माजी सैनिक मोठ्या संख्येने हजर राहून श्रद्धांजली अर्पण केली.