अक्कलकोट तालुक्यातील मौजे शावळ येथे शनिवार, दि. 30 ऑगस्ट 2025 रोजी सायं 5 वाजेच्या सुमारास दुर्दैवी घटना घडली. योगेश भास्कर माने (वय 36, रा. शावळ, तालुका अक्कलकोट) हे मासेमारीसाठी शावळ पाटबंधाऱ्याजवळ गेले असता पाण्यात बेपत्ता झाले. अद्याप पर्यंत त्यांचा शोध लागलेला नाही. या घटनेची माहिती ग्राम महसूल अधिकारी अजित तेरदाळ यांनी रविवारी दुपारी 2 वाजता दिली असून, स्थानिक नागरिकांसह महसूल प्रशासनाकडून शोधकार्य सुरू करण्यात आले आहे.