हिंगणा मतदार संघातील कान्होली येथे क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण आमदार समीर मेघे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून पूजन केले. याप्रसंगी बिरबोरगाव येथील आदिवासी मुला मुलींनी आदिवासी स्वागत नृत्य सादर केले. सर्वांना बिरसा मुंडा जयंती उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री धनराज आष्टनकर, आतिश उमरे, मिलिंद कोवे, मधुकर वलके, सौ प्रियंका इटनकर, देवेंद्र आष्टनकर, नानाजी कैकाडे,संजय फुलकर, आदी उपस्थित होते.