Download Now Banner

This browser does not support the video element.

उमरखेड: पालकमंत्री यांची पूरग्रस्त चिंचोली गावाला भेट ; तात्काळ उपायोजना करण्याचे दिले प्रशासनाला निर्देश

Umarkhed, Yavatmal | Aug 25, 2025
उमरखेड तालुक्यातील चिंचोली संगम गावाला चोहू बाजूने पाण्याने वेढलेले होते व त्यातच शेतकरी बांधव, नागरिकांचे अतिवृष्टीमुळे शेती, घते व पशुधनाचे मोठे नुकसान झाले. पूर ओसंडून वाहणाऱ्या नाले तसेच नदीमुळे गावातील घरांची पडझड झाली तसेच शेतात पाणी साचल्याने पिकाचे मोठे नुकसान झाले. आज मा. ना.श्री संजय राठोड, (मंत्री मृद्ध व जलसंधारण) महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री यवतमाळ यांनी चिंचोली (संगम) गावास भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us