जिल्हास्तरीय अखिल भारतीय विज्ञान मेळावा 8 सप्टेबर रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास जेसीस कॉन्व्हेंट भंडारा येथे संपन्न झाला. उद्घाटन जेसीस कॉन्व्हेंटच्या प्राचार्या कविता भोंगाडे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी माडेमवार उपस्थित होतेे. जिल्हास्तरीय स्पर्धेत 'क्वांटम युगाची सुरुवात: संभाव्यता आणि आवाहने' या विषयावर सर्व तालुक्यातून प्रथम, द्वितीय आलेले विद्यार्थी स्पर्धक म्हणून सहभागी झाले.