महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्ताने जळगाव शहरात मंगळवारी, ७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० विविध धार्मिक, सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांना समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत महर्षी वाल्मिकी यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता जळगाव शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.