बार्शी तालुक्यातील ढोराळे गावात बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येलाच गुरुवार २१ रोजी दुपारी ४ च्या सुमारास बैलावर वन्य प्राण्याने हल्ला केला. नेताजी पाटील यांच्या मालकीच्या या बैलाला अज्ञात प्राण्याने दिवसाढवळ्या ठार मारले. या हल्ल्यामुळे शेतकरी आणि स्थानिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाच्या तपासानुसार, हा हल्ला बिबट्याने केल्याचा अंदाज आहे. नागरिकांना रात्रीच्या वेळी एकट्याने घराबाहेर न पडण्याचे आणि पाळीव प्राण्यांना सुरक्षित स्थळी ठेवण्याचे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.