रात्रीच्या सुमारास घराच्या मागे गेले असताना एका ४० वर्षीय ईसमाला सर्पदंश झाला. त्याला उपचारासाठी पवनी येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले मात्र प्रकृती अधिकच गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले मात्र भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आकस्मिक विभागात त्यांना तपासून मृत घोषित केल्याची घटना घडली. ही घटना २४ ऑगस्ट रोजी राञी १ वाजताच्या सुमारास घडली. योगराज वासुदेव टेंभुर्णे (४०) रा ढोरप असे घटनेतील मृतक इसमाचे नाव आहे.