दिव्यांग बांधवांना मदत करण्याच्या उद्देशाने, रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट आणि रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मोफत जयपूर कृत्रिम पाय वाटपासाठी तपासणी आणि मापे घेण्याचा कार्यक्रम पार पडला. या उपक्रमाला दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला. सुमारे १०० ते १५० दिव्यांग बांधवांनी या शिबिरात उपस्थिती लावली.