जडीबुटी विकणाऱ्या एका फिरत्या विक्रेत्यावर दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून गावगुंडाने चाकूने वार केल्याची घटना २७ ऑगस्ट रोजी सकाळी घडली. या हल्ल्यात विक्रेता गंभीर जखमी झाला असून, आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गणेश गजराजीसिंग ठाकूर (३८, रा. परसुडी रोड, धामणगाव रेल्वे, जि. अमरावती) हे आपल्या वृद्ध आई-वडिलांसह जडीबुटी विक्री करून उदरनिर्वाह करतात. मागील काही दिवसांपासून ते जाफ्राबाद रोड परिसरात वास्तव्यास होते.