जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहाण यांनी दि. 8 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद येथे जिल्ह्यातील निवडक शिक्षकांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये नवोदय, शिष्यवृत्ती आणि NMMS या स्पर्धा परीक्षांमध्ये जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेचे जास्तीत जास्त विद्यार्थी कसे पात्र ठरतील याविषयी विचार मंथन करण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी संजय ससाने, उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव यांच्यासह शिक्षकांचे उपस्थिती होती.