शिरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदीप पवार यांच्यावर करण्यात आलेले आरोप खोटे व बिनबुडाचे असून या प्रकरणात वस्तुस्थिती समोर यावी म्हणून संबंधितांची चौकशी करण्यात यावी,अशी सरपंच महासंघाने शिरपूर उपविभागीय अधिकारी डॉ.शरद मंडलिक यांना 21 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास निवेदन देत मागणी केली.