हिंगणघाट शेतकरी संघटनेच्या वतीने स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेशाअध्यक्ष मधुसूदन हरणे यांच्या मार्गदर्शनात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी तहसिल कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन उपविभाग अधिकारी आकाश अवतरे याच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.