गोंडपिंपरी शहरात ट्रकच्या भीषण अपघातात रस्त्याच्या कडेला असलेल्या एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जन गंभीर झाल्याची घटना आज दिनांक ४ ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता घडली. हा अपघात इतका भीषण होता की ट्रॅक ने धडक दिल्यानंतर एकास २०० मीटर फरफटत जुना बस स्टॉप पर्यंत नेले. मृतकाचे नाव अजय सुबोधासिंग मंडल वय (३२) असून बिहार येथील रहिवासी आहे.