गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक लांजा उपविभागात गस्त घालत असताना, त्यांना ओणी ते पाचल मार्गावरील अणुस्कुरा घाटातून गोवंश जातीच्या जनावरांची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीनुसार, 29/08/2025 रोजी रायपाटण येथे पथकाने तपासणी नाका लावला. पहाटे 5:55 वाजता पथकाने दोन वाहने थांबवली - एक महिंद्रा जिनीओ (MH-04-FP-6424) आणि दुसरी आयशर प्रो-1059 (MH-07-X-1511) यांच्या तपासणीत महिंद्रा जिनीओ गाडीमध्ये 8 आणि आयशर गाडीमध्ये 11, अशी एकूण 19 गोवंश होते