दरवर्षी प्रमाणे मिरजेत गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा झाला. ११ दिवस गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात भाविक व कार्यकर्ते मग्न असतानाच मनपाचे स्वच्छता कर्मचारी मात्र दिवसातील १२-१५ तास राबून आपले कर्तव्य पार पाडत होते. मिरज शहरात लाखो गणेशभक्तांची उपस्थिती असलेली 32 तासांची विसर्जन मिरवणूक मोठ्या जल्लोषात पार पडली आणि अवघ्या काही तासातच स्वच्छता कर्मचाऱ्यांनी तब्बल 58 टनांहून अधिक कचरा उचलून शहर चकाचक केले. मिरवणूक मार्गावर कार्यकर्ते बेभान होऊन नाचत असतानाच पाठोपाठ मिरवणूक मार्गावरील