भोजापूर पूरचारी दुरुस्तीसाठी १४ कोटींचा निधी मंजूर : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती संगमनेर तालुक्यातील भोजापूर चारीवर अवलंबून असलेल्या गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महायुती सरकारकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. जलसंपदा विभागाने भोजापूर पूरचारी दुरुस्तीसाठी तब्बल १४ कोटी ४६ लाख २१ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे.ही महत्त्वाची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.